10 वी नंतर काय करावे ?

WhatsApp Group Join Now

माध्यमिक शिक्षण खऱ्या अर्थाने पूर्ण होत जातं ते इ. दहावीची परीक्षा दिल्यानंतर आणि पुढे प्रश्न पडतो तो असा की 10 वी नंतर काय करावे ? आता कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा? त्यासाठी विद्यार्थी कोणता निकष लावतात, मला किती टक्के मार्क मिळाले? शेकडा ७० पेक्षा जास्त मार्क मिळाले तर विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा. ५० ते ७० टक्के मार्क मिळविणारा विद्यार्थी मध्यम मार्ग निवडताना दिसतात तो मार्ग म्हणजे वाणिज्य शाखा. उर्वरित काही कला शाखेकडे वळताना दिसतात, तर काही आय. टी. आय. सारख्या व्यवसायाभिमुख कोर्ससाठी अॅडमिशन घेतात किंवा किमान कौशल्य अर्थातच तांत्रिक विभागात प्रवेश घेतात.

10 वी नंतर काय करावे ?
10 वी नंतर काय


आता या दहावीनंतरच्या शाखांचा विस्तार कशा प्रकारे पुढे होत जातो. त्यांच्या उपशाखा कोणत्या ते आपण पाहू.
दहावीनंतर कला, विज्ञान, वाणिज्य आणि तांत्रिक (Technical) अशा चार शाखांचा उगम होतो. या शाखा अंतर्गत प्रवेश घेतल्यानंतर त्यांचा विस्तार कसा होत जातो. ते खाली दिलेल्या मुद्द्यांवरून लक्षात येईल.

१) कला

कला शाखेतील विद्यार्थ्यांना योग्य वेळी मार्गदर्शन झाल्यानंतर या शाखेतील विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळते. बहुदा असे पाहावयास मिळते की, दहावीला कमी मार्क्स मिळाले म्हणून घेऊया आर्ट्स. पारंपरिक पद्धतीने महाविद्यालयात जाणे. रिझल्टचे टेन्शन बहुसंख्य विद्यार्थी घेताना दिसत नाहीत. त्यामुळे या शाखेतील विद्यार्थी दिशाहीन होताना दिसतो आहे. त्यासाठी या पुस्तकामधून योग्य मार्गदर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कला शाखेत शिकत असताना प्रत्येक विषय विद्यार्थ्यानं गांभीर्याने घेतला, तर या शाखेमध्ये करिअरची मोठी संधी चालून आल्याशिवाय राहणार नाही. या शाखेत विषय निवड गांभीर्याने करायला हवी. विषय निवडताना विद्यार्थ्यांनी स्वतःचा कल तपासून पाहणे आवश्यक आहे.


कला शाखेत प्रवेश घेतल्यानंतर इयत्ता अकरावी व बारावी इयत्तेत मराठी, इंग्रजी, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, हिंदी, इतिहास, सामाजिक शास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल या विषयांचा पायाभूत अभ्यास अकरावी व बारावी इयत्तेत केला जातो.
बारावीनंतर पुढे काय?


बारावी कला उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील कोर्सेससाठी प्रवेश घेता येतो.


१) डी. एड.
२) बी. एस. एल. एल. बी.
३) बी. ए. (अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, सामाजिक शास्त्र, भूगोल, संस्कृत, संगीत इ.)
४) आय. टी. आय. ५ ) कोर्सेस

२) विज्ञान

विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या बौद्धिक पातळीवर काहीसा ताण पडायला
सुरुवात होते. या शाखेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास असंख्य संधी निर्माण होतात. विज्ञान शाखेतील
विद्यार्थ्यांमध्ये असलेली जिज्ञासू वृत्ती त्याला उच्च ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी पुरेशी ठरते. विज्ञान
शाखेमध्ये रसायनशा, जीवशाखर, भौतिकशार, गणित या मुख्य विषयांचा समावेश होतो, तर मराठी
व इंग्रजी या दोन मुख्य भाषा अभ्यासावयास असतात. भूगोल व कृषी क्षेत्राशी संबंधित विषय हे ऐच्छिक
विषय असतात.

विज्ञान शाखेत १ २वीनंतर पुढे काय ?


१) वैद्यकीय (MEDICINE) शाखा
१) एम. बी. बी. एस. (M. B. B. S.)
२) बी. डी. एस. (B. D. S)
३) बी. फार्मसी. (B. Pharma)
४) बी. ए. एम. एस.
५) बी. एच. एम. एस.
६) पॅरामेडिकल कोर्सेस
अ) फिजिओथेरपी
ब) सी. एम. एल. टी.
क) स्पीच थेरपी
ड) नर्सिंग
इ) ऑप्टोमेट्री


२) अभियांत्रिकी (Engineering)
१) सिव्हिल इंजिनिअर
२) मेकॅनिकल इंजिनिअर
३) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर
४) मेटॅलर्जी इंजिनिअर
५) कॉम्प्युटर इंजिनिअर
६) प्रॉडक्शन इंजिनिअर
७) मरिन इंजिनिअरिंग


३) तांत्रिक डिप्लोमा

  1. IIT
  2. NIIT
  3. VJIT

3) बी. एस्सी

  1. सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology)
  2. रसायनशास्त्र (Chemistry)
  3. भौतिकशास्त्र (Physics)
  4. संख्याशास्त्र (Statistics)
  5. गणित (Mathematics)
  6. वनस्पतीशास्त्र (Botony)
  7. प्राणिशास्त्र (Zoology)
  8. बायोकेमिस्ट्री (Biochemistry)
  9. इलेक्ट्रॉनिक्स (Electronics)
  10. विमाशास्त्र (Acturial science)

बी. एस्सी. (अॅग्रिकल्चर)

बी. सी. ए. (Bachelor of Computer Application)

बी. बी. ए. (Bachelor of Business Administration)

बी. सी. एस. (Bachelor of Computer Science)

बी. एस्सी. (बायोटेक्नॉलॉजी)

बी. एस्सी. (आय. टी.)

बी. एस्सी. (हॉटेल मॅनेजमेंट)

३) वाणिज्य

वाणिज्य शाखेत प्रवेश घेतल्यानंतर या शाखेमध्ये मुख्यत: व्यवसाय आणि वित्तीय या दोन प्रमुख बाबी अभ्यासल्या जातात. डदा. अर्थशाख, टॅक्सेशन , वाणिज्य संघटन, अकाऊंटंसी, ऑडिटिंग, गणित, चिटणीसाची कार्यपद्धती, कॉस्टिंग या विषयाचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो.

पूर्वी इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला प्रवेश मिळाला नाही, तर मग जा कॉमर्सला – असा उपदेश केला जात असे. कॉमर्स हे एक उपेक्षित आणि दुर्लक्षित कार्यक्षेत्र म्हणून बघितलं जाई. या क्षेत्रात करिअर करायला चांगली संधी आहे व शाखेला ग्लॅमरही मिळालं आहे.


वाणिज्य क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येतं. कॉमर्स म्हणजे व्यापार शिक्षण, कॉस्ट अकाउंटिंग, चार्टर्ड अकाउंटंट, फायनान्शइयल अकाउंटंट, परदेश व्यापार प्रशिक्षण अशा अनेक विषयांत स्वतंत्र पदव्या आणि पदविका मिळतात.


भारतातील अनेक उद्योगसमूहांचे अध्यक्ष कॉमर्स विषयातील पदवीधर आहेत. या उद्योगपतींनी अर्थव्यवस्थापनाची मूलतत्त्वे आणि करनियोजन या विषयांचा सखोल अभ्यास केल्यामुळेच ते यशाच्या उच्च शिखरावर विराजमान झाले आहेत. वाणिज्य क्षेत्रात नुसती पदवी मिळवून निभाव लागणं कठीण आहे. त्यामुळे या क्षेत्राला पूरक ठरणारं शिक्षण घेतल्यास त्याचा उपयोग होतो. वाणिज्य क्षेत्रातील पदवी घेऊन बँक, विमाक्षेत्र, शेअर मार्केट अशा अनेक ठिकाणी नोकरीची चांगली संधी मिळू शकते.

वाणिज्य शाखेत १२ वीनंतर पुढे काय ?

वाणिज्य शाखेमध्ये असंख्य संधी उपलब्ध आहेत. या संधी तुम्हाला पुढील वेगवेगळ्या कोर्सेंससाठी प्रवेश घेऊन मिळविता येतील. अर्थविषयक सर्व घडामोडींचा अभ्यास वाणिज्य शाखेत केला जातो. वाणिज्य शाखेच्या पदवीधरांना पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी वेगवेगळे कोसेंस करता येतात. या कोसेंसमध्ये प्रामुख्याने व्यवस्थापन, चार्टर्ड अकाऊंटंट, एम. कॉम. या ज्ञानशाखांचा समावेश होतो.

१२ वीनंतर पुढील कोसेंस करता येतात.

  • बी. कॉम.
  • आय. सी. डब्ल्यू. ए. (cost accountant)
  • ३) सी. एफ. ए. (chartered financial analyst)

वरील ICWA व CFA हे कोर्स ग्रॅज्युएशन चालू असताना पूर्ण करताना म्हणजेच बी. कॉम करत असताना पूर्ण करता येतात. त्यानंतर तुम्ही कॉस्ट अकौंटंट व चार्टर्ड फायनान्सशियल अँनालिस्ट म्हणून काम करू शकता.

वाणिज्य शाखेतून पुढील सर्टिफिकेट कोर्स व डिप्लोमा सुद्धा करता येतात.

  • इिप्लोमा इन अकॉौटंन्सी
  • डिप्लोमा इन सेक्रेटरियल प्रॅक्टिस
  • डिप्लोमा इन कॉमर्स
  • सर्टिफिकेट कोर्स इन बुक किपींग अँड अकौंटन्सी
  • पर्सनल सेक्रेटरी
  • सर्टिफिकेट कोर्स इन शॉर्ट हॅन्ड टायपिंग

१० वी, १२ वी झाल्यानंतर तुमच्यासमोर मोठा प्रश्न असतो तो म्हणजे करिअर निवडण्याचा. आपल्या मनात करिअरविषयी नेमक्या काय कल्पना असतात. ‘करिअर’ या संकल्पनेतून आपल्याला काय अभिप्रेत असतं ?
एक म्हणजे आपण निवडलेल्या क्षेत्रात दिर्घकाळ राहून पैसा व नाव कमवायचे आहे, या व्यतिरिक्त आपल्याला करिअरविषयी असे म्हणायचे असते की, मी निवडलेल्या क्षेत्राचा मला नीट अभ्यास करायचा आहे. खूप कामाचा अनुभव घ्यायचा आहे. या क्षेत्रात काम केल्याने मला समाधान मिळेल. थोडक्यात काय, तर आपल्या मनातील वरिल सर्व गोष्टीचा सर्व समावेशक अर्थ म्हणजे करिअर असे म्हणण्यास हरकत नाही.

नक्की वाचा –

गिरनार पर्वत माहिती मराठी | Girnar Parvat History in Marathi
WhatsApp Group Join Now

Leave a Comment