बोरन्हाण का करावे ? व कसे करावे ? संपूर्ण माहिती मराठी | Bornhan in marathi makarsankrant kinkrant

बोरन्हाण हा शिशुसंस्कार बहुतांश लोकांना परिचित आहे. लहान मुलांना बोरन्हाण घालण्याची प्रथा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी मुलांना बोरन्हाण घातले जाते. या निसर्गाशी आणि बदलत्या ऋतुमानाशी जुळवून घेत शारीरक आरोग्य राखण्यासाठी हा सोहळा साजरा केला जातो. बोरन्हाण घालताना त्यात बाळाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या आणि लहान मुलांना आवडणाऱ्या वस्तूंचा समावेश केला जातो. अगदी तान्ह्या बाळापासून ते पाच वर्षांपर्यंत मुलांचे बोरन्हाण केले जाते. या सोहळ्यातून बाळाची संस्कृतीशी, परंपरेशी आणि निसर्गाशी ओळख व्हावी हा यामागचा उद्देश असतो. जसे आपण आपले बालपणीचे फोटो पाहून सुखावतो, त्याचप्रमाणे बाळासाठी या आठवणी साठवल्या जातात.

() { googletag.defineSlot('/22645415724/aaplemarathi_ad/header_ad', [[970, 90], [728, 90], [320, 50], [300, 50]], 'div-gpt-ad-1728280498499-0').addService(googletag.pubads()); googletag.pubads().enableSingleRequest(); googletag.enableServices(); });

बोरन्हाण का करावे ?

बोरन्हाण म्हणजेच निसर्गातील वेगवेगळ्या वस्तूंनी बाळाला आंघोळ घातली जाते. या वस्तूंमध्ये बाळाला इजा होणार नाही अशा हलक्या आणि आरोग्यदायी वस्तूंचा समावेश केला जातो. यात लाह्या, चुरमुरे, चिंचा, बोरं, भुईमुगाच्या शेंगा आणि गाजराचे तुकडे अशा नैसर्गिंक वस्तूंसोबत लहान मुलांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या गोळ्या, चॉकलेट आणि बिस्कीटांचाही वापर केला जातो. या सोहळ्यामुळे बाळाचा या वस्तूंसोबत परिचय होतो आणि त्याला त्या अतिशय गमतीशीर वाटू लागतात. तसेच या सोहळ्यात इतर लहान मुलांनाही आमंत्रित केले जाते. त्यामुळे बाळाची त्यांच्यासोबत ओळख होते आणि हा सोहळा त्याच्या कायम आठवणीत राहतो.

बोरन्हाण का केले जाते ?

मकरसंक्रांतीला केले जाते बोरन्हाण बोरन्हाण हा एक अतिशय उत्साह वाढवणारा आणि नाती जपणारा आनंददायी सोहळा असतो. त्यामुळे या सोहळ्यासाठी बाळाला आकर्षक पोषाक परिधान केला जातो. मुलांना काळ्या रंगाचे कपडे आणि मुलांना खणाचा फ्रॉक घातला जातो. या दिवशी काळ्या रंगांच्या कपड्यांना महत्व दिले जाते. कारण मकरसंक्रांतीचा दिवस हा हिवाळ्यातील सर्वांत थंड दिवस मानला जातो. त्यामुळे उष्णता शोषूण शरीर उबदार ठेवणाऱ्या काळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर केला जातो. तसेच या काळ्या रंगावर बाळाला शोभून दिसेल असेल पांढरे दागिने घातले जातात. यात हार, मुकूट, पैंजण, कडे, बांगड्या, वाळ्या अशा अनेक दागिण्यांचा समावेश असतो. बोरन्हाण सोहळ्याचे महत्त्व बोरन्हाण हा बाळाचा सोहळा असला तरी तो मोठ्यांसाठी देकील तेवढाच महत्त्वाचा असतो. या सोहळ्याच्या निमित्ताने स्त्रिया आपल्या मुलांना घेऊन घरी आलेल्या लेकुरवाळ्यांचाही हळद कुंकू लावून सन्मान करतात. तसेच तीळ-गुळासह जेवण आणि गोडाचे पदार्थ देऊन त्यांचे आदरातिथ्य केले जाते. या सोहळ्यानिमित्त नातेवाईक आणि मित्रमंडळी घरी येतात आणि यानिमित्ताने त्यांच्या गप्पा-गोष्टी रंगतात. हा समारंभ घरगुती असतो परंतु घरी गजबज असल्याने तो अतिशय उत्साही आणि आनंद देणारा असतो. 

bornahan quotes in marathi

निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात, अर्धागिनी म्हणुन … ने दिला माझ्या हातात हात.

कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास, … देतो मी लाडवाचा घास.

सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल, संसार करु सुखाचा … तु, मी आणि एक मुल.

ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस, …….तू मला, सुपरवूमन वाटतेस.

दारी होते कोनाडे त्यात होती पळी, माझी …व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी.

गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा, ……..च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा.

bornhan rangoli ideas

bornhan decoration ideas

Hanuman Chalisa Marathi 2024 – हनुमान चालीसा मराठी

Mahalaxmi Marathi Calendar 2024 – महालक्ष्मी मराठी कैलेंडर 2024 Panchang PDF Free Download

Leave a Comment