Gurucharitra Adhyay 14 | गुरुचरित्र अध्याय १४ | Shree Gurucharitra Adhyay 14 With Lyrics

WhatsApp Group Join Now

मित्रानो, श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ हा भारतातील एक महत्वपूर्ण ग्रंथ म्हणून ओळखला जातो. श्री श्रीगुरुचरित्र या पुस्तकात १ ते ५३ अध्याय आहेत . Gurucharitra Adhyay 14 ( गुरुचरित्र अध्याय १४ ) हा यातील च एक महत्वपूर्ण अध्याय आहे . Gurucharitra Adhyay 14 ( गुरुचरित्र अध्याय १४ ) वाचल्याने चागले फायदे होतात. श्री Gurucharitra Adhyay 14 या अध्यायाची संपूर्ण माहिती खाली देली आहे.

हा Gurucharitra Adhyay 14 संपूर्ण अध्याय खाली दिला आहे जर तुम्हाला याची प्रिंट काढायची असेल तर खाली share बटन वर दाबून काडू शकता आणि आपल्या जवळील लोकांना नक्की share करा.

Gurucharitra Adhyay 14
Gurucharitra Adhyay 14

श्रीगुरुचरित्र-ग्रंथ माहात्म्य – Gurucharitra Adhyay 14

सरस्वती गंगाधर कृत ‘श्रीगुरुचरित्र’ या ग्रंथात श्रीदत्तात्रेय, श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंह सरस्वती या तीन अवतारी पुरुषोत्तमांच्या अद्भुत लीलांचे वर्णन आहे. या ग्रंथाला श्रीगुरू नृसिंहसरस्वतींची पूर्ण कृपा लाभलेली असल्याने हा ग्रंथ ‘अनुभवसिद्ध’ म्हणून प्रख्यात आहे. या वरदग्रंथाला वेदतुल्य मानले जाते. हा अद्वितीय ग्रंथ दत्तोपासकांमध्ये अत्यंत प्रिय असून या ग्रंथाच्या पठण -पारायणरूपी सेवेने श्रीगुरूंची प्रसन्नता लाभून भक्तांचे सर्व मंगल होते.

|| चौदाव्या अध्यायाची फलश्रुती ।।

श्रीगुरूंच्या चरणी दृढतर विश्वास व अतूट श्रद्धा ठेवून श्रीगुरुचरित्र ग्रंथातील चौदाव्या अध्यायाचे सहा महिने नियमपूर्वक नित्य पठण केल्यास अचानक उद्भवलेली संकटे, हितशत्रूचा त्रास, प्रापंचिक अडचणी, प्रदीर्घ आजार व अकाली , मृत्यूयोग यांचे निवारण होऊन गृहसौख्य, समृद्धी व समाधान प्राप्त होईल.

गुरुचरित्र अध्याय १४ व्या अध्यायाच्या उपासनेविषयी काही मार्गदर्शक सूचना –

  • उपासनेचा कालावधी ६ महिने (गुरुवारी प्रारंभ करावा).
  • ही उपासना बारा वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीने करावी.
  • शुचिर्भूत असावे, सदाचाराने वागावे. उपवासाचे बंधन नाही
  • उपासनेची वेळ निश्चित असावी. पठणसेवेत खंड पडू देऊ नये.
  • वेळेपूर्वी कार्यसिद्धी झाली तरी संकल्पित उपासना पूर्ण करून सांगताही करावी.
  • सोवळ्याने वाचन करावे. वाचन होईपर्यंत दीप अखंड ठेवावा.

Sant Dnyaneshwar information in Marathi | संत ज्ञानेश्वर माहिती मराठी (aaplemarathi.com)

Gurucharitra Adhyay 14 | गुरुचरित्र अध्याय १४

                             || श्री गुरुचरित्र ||

श्रीगणेशाय नमः नामधारक शिष्य देखा । विनवी सिद्धासी कवतुका । प्रश्न करी अतिविशेखा । एकचित्तें परियेसा ॥१॥ 
जय जया योगीश्वरा । सिद्धमूर्ति ज्ञानसागरा । पुढील कथा विस्तारा । ज्ञान होय आम्हांसी ऐसी॥२॥
उदरव्यथेच्या ब्राह्मणासी । प्रसन्न जाहले कृपेसीं । पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारावें आम्हांप्रति ॥३॥ 
ऐकोनि शिष्याचें वचन । संतोष करी सिद्ध आपण । गुरुचरित्र कामधेनु जाण । सांगता जाहला विस्तारें ॥४॥ ऐक शिष्या शिखामणि । भिक्षा केली ज्याचे भुवनीं । तयावरी संतोषोनि । प्रसन्न जाहले परियेसा ॥५॥ गुरुभक्तीचा प्रकारु । पूर्ण जाणे तो द्विजवरु । पूजा केली विचित्रु । म्हणोनि आनंद परियेसा ॥६॥
या सायंदेव द्विजासी । श्रीगुरु बोलती संतोषीं । भक्त हो रे वंशोवंशीं । माझी प्रीति तुजवरी ॥७॥ 
ऐकोनि श्रीगुरुचें वचन । सायंदेव विप्र करी नमन । माथा ठेवून चरणीं । न्यासिता झाला पुनःपुन्हा ॥८॥ 
जय जया जगद्गुरु । त्रयमूर्तीचा अवतारू । अविद्यामाया दिससी नरु । वेदां अगोचर तुझी महिमा ॥९॥ विश्वव्यापक तूंचि होसी । ब्रह्मा-विष्णु-व्योमकेशी । धरिला वेष तूं मानुषी । भक्तजन तारावया ॥१०॥
 तव महिमा वर्णावयासी । शक्ति कैंची आम्हांसी । मागेन एक आतां तुम्हांसी । तें कृपा करणें गुरुमूर्ति ॥११॥ माझे वंशपारंपरीं । भक्ति द्यावी निर्धारीं । इह सौख्य पुत्रपौत्रीं । उपरी द्यावी सद्गति ॥१२॥
 
ऐसी विनंति करुनी । पुनरपि विनवी करुणावचनीं । सेवा करितो द्वारयवनीं । महाशूरक्रूर असे ॥१३॥ प्रतिसंवत्सरीं ब्राह्मणासी । घात करितो जीवेसीं । याचि कारणें आम्हांसी । बोलावीतसे मज आजि ॥१४॥
जातां तया जवळी आपण । निश्चयें घेईल माझा प्राण । भेटी जाहली तुमचे चरण । मरण कैंचें आपणासी १५॥ संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । अभयंकर आपुले हातीं । विप्रमस्तकीं ठेविती । चिंता न करीं म्हणोनियां ॥१६॥
भय सांडूनि तुवां जावें । क्रूर यवना भेटावें । संतोषोनि प्रियभावें । पुनरपि पाठवील आम्हांपाशीं ॥१७॥ 
जंववरी तूं परतोनि येसी । असों आम्ही भरंवसीं । तुवां आलिया संतोषीं । जाऊं आम्ही येथोनि ॥१८॥
निजभक्त आमुचा तूं होसी । पारंपर-वंशोवंशीं । अखिलाभीष्ट तूं पावसी । वाढेल संतति तुझी बहुत ॥१९॥ 
तुझे वंशपारंपरीं । सुखें नांदती पुत्रपौत्रीं । अखंड लक्ष्मी तयां घरीं । निरोगी होती शतायुषी ॥२०॥ 
ऐसा वर लाधोन । निघे सायंदेव ब्राह्मण । जेथें होता तो यवन । गेला त्वरित तयाजवळी ॥२१॥ 
कालांतक यम जैसा । यवन दुष्ट परियेसा । ब्राह्मणातें पाहतां कैसा । ज्वालारुप होता जाहला ॥२२॥ 
विमुख होऊनि गृहांत । गेला यवन कोपत । विप्र जाहला भयचकित । मनीं श्रीगुरुसी ध्यातसे ॥२३॥। 
कोप आलिया ओळंबयासी । केवीं स्पर्शे अग्नीसी । श्रीगुरुकृपा होय ज्यासी । काय करील क्रूर दुष्ट ॥२४॥
गरुडाचिया पिलियांसी । सर्प तो कवणेपरी ग्रासी । तैसें तया ब्राह्मणासी । असे कृपा श्रीगुरुची ॥२५॥ 
कां एखादे सिंहासी । ऐरावत केवीं ग्रासी । श्रीगुरुकृपा होय ज्यासी । कलिकाळाचें भय नाहीं ॥२६॥ 
ज्याचे ह्रुदयीं श्रीगुरुस्मरण । त्यासी कैंचें भय दारुण । काळमृत्यु न बाधे जाण । अपमृत्यु काय करी ॥२७॥ ज्यासि नाहीं मृत्यूचें भय।त्यासी यवन असे तो काय । श्रीगुरुकृपा ज्यासी होय । यमाचें मुख्य भय नाहीं ॥२८॥ ऐसेपरी तो यवन । अंतःपुरांत जाऊन । सुषुप्ति केली भ्रमित होऊन । शरीरस्मरण त्यासी नाहीं ॥२९॥ ह्रुदयज्वाळा होय त्यासी । जागृत होवोनि परियेसीं । प्राणांतक व्यथेसीं । कष्टतसे तये वेळीं ॥३०॥
स्मरण असें नसे कांहीं । म्हणे शस्त्रें मारितो घाई । छेदन करितो अवेव पाहीं । विप्र एक आपणासी ॥३१॥ स्मरण जाहलें तये वेळीं । धांवत गेला ब्राह्मणाजवळी । लोळतसे चरणकमळीं । म्हणे स्वामी तूंचि माझा ॥३२॥ येथें पाचारिलें कवणीं । जावें त्वरित परतोनि । वस्त्रें भूषणें देवोनि । निरोप देतो तये वेळीं ॥३३॥ 
संतोषोनि द्विजवर । आला ग्रामा वेगवक्त्र । गंगातीरीं असे वासर । श्रीगुरुचे चरणदर्शना ॥३४॥ 
देखोनियां श्रीगुरुसी । नमन करी तो भावेसीं । स्तोत्र करी बहुवसीं । सांगे वृत्तांत आद्यंत ॥३५॥ 
संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । तया द्विजा आश्वासिती । दक्षिण देशा जाऊं म्हणती । स्थान-स्थान तीर्थयात्रे ॥३६॥
ऐकोनि श्रीगुरूचें वचन । विनवीतसे कर जोडून । न विसंबें आतां तुमचे चरण । आपण येईन समागमें ॥३७॥ तुमचे चरणाविणें देखा । राहों न शके क्षण एका । संसारसागरतारका । तूंचि देखा कृपासिंधु ॥३८॥ 
उद्धरावया सगरांसी । गंगा आणिली भूमीसी । तैसें स्वामीं आम्हांसी । दर्शन दिधलें आपुलें ॥३९॥ 
भक्तवत्सल तुझी ख्याति । आम्हां सोडणें काय निति । सवें येऊं निश्चितीं । म्हणोनि चरणीं लागला ॥४०॥ येणेंपरी श्रीगुरुसी । विनवी विप्र भावेसीं । संतोषोनि विनयेसीं । श्रीगुरु म्हणती तये वेळीं ॥४१॥ 
कारण असे आम्हां जाणें । तीर्थे असती दक्षिणे । पुनरपि तुम्हां दर्शन देणें । संवत्सरीं पंचदशीं ॥४२॥
आम्ही तुमचे गांवासमीपत । वास करुं हें निश्चित । कलत्र पुत्र इष्ट भ्रात । मिळोनि भेटा तुम्ही आम्हां ॥४३॥ न करा चिंता असाल सुखें । सकळ अरिष्टें गेलीं दुःखें । म्हणोनि हस्त ठेविती मस्तकें । भाक देती तये वेळीं ॥४४॥ ऐसेपरी संतोषोनि । श्रीगुरु निघाले तेथोनि । जेथें असे आरोग्यभवानी । वैजनाथ महाक्षेत्र ॥४५॥ 
समस्त शिष्यांसमवेत । श्रीगुरु आले तीर्थे पहात । प्रख्यात असे वैजनाथ । तेथें राहिले गुप्तरुपें ॥४६॥ नामधारक विनवी सिद्धासी । काय कारण गुप्त व्हावयासी । होते शिष्य बहुवसी । त्यांसी कोठें ठेविलें ॥४७॥ गंगाधराचा नंदनु । सांगे गुरुचरित्र कामधेनु । सिद्धमुनि विस्तारुन । सांगे नामकरणीस ॥४८॥
पुढील कथेचा विस्तारु । सांगतां विचित्र अपारु । मन करुनि एकाग्रु । ऐका श्रोते सकळिक हो ॥४९॥ 

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे क्रूरयवनशासनं-सायंदेववरप्रदानं नाम चतुर्दशोऽध्यायः ॥१४॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेव दत्त ॥

मित्रानो, श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ हा भारतातील एक महत्वपूर्ण ग्रंथ म्हणून ओळखला जातो. श्री श्रीगुरुचरित्र या पुस्तकात १ ते ५३ अध्याय आहेत . Gurucharitra Adhyay 14 ( गुरुचरित्र अध्याय १४ ) हा यातील च एक महत्वपूर्ण अध्याय आहे . Gurucharitra Adhyay 14 ( गुरुचरित्र अध्याय १४ ) वाचल्याने चागले फायदे होतात. श्री Gurucharitra Adhyay 14 या अध्यायाची संपूर्ण माहिती खाली देली आहे.

महालक्ष्मी व्रत कथा | mahalaxmi vrat katha marathi (aaplemarathi.com)

हा Gurucharitra Adhyay 14 संपूर्ण अध्याय खाली दिला आहे जर तुम्हाला याची प्रिंट काढायची असेल तर खाली share बटन वर दाबून काडू शकता आणि आपल्या जवळील लोकांना नक्की share करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment