कुणबी प्रमाणपत्र कसे काढावे ?|लागणारी कागतपत्रे ?

WhatsApp Group Join Now


महसूल, ग्रामपंचायत, शिक्षण, पोलिस अशा सर्वच शासकीय विभागाकडील १९६७ पूर्वीच्या कुणबी नोंदी तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सोलापूर जिल्ह्यात जवळपास दीड कोटी दस्ताऐवज तपासून झाले असून त्यात २२ हजारांवर नोंदी आढळल्या आहेत.

कुणबी प्रमाणपत्र कसे काढावे ?
How To Get Kunbi Certificate

राज्यात सर्वाधिक कुणबी नोंदी नगर, धुळे, पुणे, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, जालना या जिल्ह्यांमध्ये आढळल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात जवळपास २२ हजार नोंदी आढळल्या असून ९ नोव्हेंबरपासून शाळांमधील नोंदी तपासल्या जात आहेत. आठ लाख दाखल्यांची तपासणी पूर्ण झाली असून त्यात १६४ नोंदी ‘कुणबी’च्या आढळल्या असून अद्याप तपासणी सुरुच आहे. ३ डिसेंबर रोजी सर्वच जिल्ह्यातील नोंदीचा अहवाल राज्य सरकारला पाठविला जाणार आहे. मनोज जरांगे- पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे.

कोण कोणत्या जिल्ह्यात किती कुणबी नोंदी आढळल्या ?

  • अहमदनगर – ५७ हजार
  • जळगाव – ४५ हजार
  • धुळे – ३१ हजार
  • जालना – २ हजार
  • बीड – २ हजार
  • छत्रपती संभाजी नगर – ६००
  • नांदेड – ३१७
  • लातूर – ५१
  • धाराशिव – ३४४
  • हिंगोली – २५
  • कोल्हापूर – ५ हजार
  • रत्नागिरी – ५९
  • पुणे – २० हजार
  • सांगली – २ हजार
  • सोलापूर – २ हजार

वरील पैकी बहुतांश जिल्हा मध्ये लाखोंच्या संख्येने नोंदी आढळलेल्या आहेत. या पैकी अनेक जिल्ह्यात आता आता अजून मोठ्या प्रमाणात नोंदी तपासण्याचे काम सुरू आहेत.खालील दिलेल्या माहितनुसार तुम्ही आपल्या जवळील कार्यालयात कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकता.

या पार्श्वभूमीवर दिवाळी सुट्ट्यांमध्ये देखील शिक्षक, मुख्याध्यापकांसह बहुतेक शासकीय विभागांमधील राज्यात ४५ हजारांवर कर्मचारी नोंदी तपासत असल्याची स्थिती आहे. त्यात १९४८ ते १९६७ आणि १९४८ पूर्वीच्या नोंदींची पडताळणी केली जात आहे. दरम्यान, वंशावळ जुळवून उर्वरित कागदपत्रे असल्याशिवाय जात प्रमाणपत्र दिले जात नाही. परिपूर्ण प्रस्ताव दाखल केलेल्यांना एका महिन्यातच जात प्रमाणपत्रे दिली जात आहेत.

‘कुणबी’ प्रमाणपत्रासाठी ‘या’ कागदपत्रांसह ऑनलाईन करा अर्ज, ४५ दिवसांत मिळेल जात प्रमाणपत्र..!

कुणबी प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जासोबत जोडावीत ‘ही’ कागदपत्रे

  • वंशावळ (वडिल, आजोबा, पणजोबा) काढून त्याची पुराव्यानिशी जुळवावी लागणार. वंशावळ पाहण्यासाठी तुम्ही यूट्यूब वरून माहिती घेऊ शकता.
  • अर्जदाराचा रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड
  • अर्जदाराचे आधारकार्ड, रेशनकार्ड
  • जन्म- मृत्यू नोंदीचा १९६७ पूर्वीचा पुरावा
  • कुटुंबातील व्यक्तीचे जात किंवा जात वैधता प्रमाणपत्र (बंधनकारक नाही).

कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागतपत्रे

अर्ज कोठे करावा,‌ दाखला किती दिवसात मिळतो

  • सेतू बंद असल्याने महा-ई-सेवा केंद्रातून तहसीलदारांकडे करावा अर्ज.
  • महा- ई – सेवा केंद्रामध्ये जाताना वरीलपैकी महत्वपूर्ण कागतपत्रे घेऊन जाणे.
  • अर्ज केल्यानंतर ४५ दिवसांत दाखला देणे बंधनकारक.
  • अर्ज करताना जात प्रमाणपत्रासाठी द्यावे लागेल ५३ रुपयांचे शासकीय शुल्क.
  • अर्जात त्रुटी असल्यास अर्जदाराला मोबाईलवर आलेल्या मॅसेजद्वारे समजणार.

कृपया ही महत्त्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा…

नक्की वाचा –

मराठा आणि कुणबी यांच्यामधे फरक काय ?
कुणबी प्रमाणपत्र कसे काढावे?
WhatsApp Group Join Now

Leave a Comment