मराठा आणि कुणबी यांच्यामधे फरक काय ?

WhatsApp Group Join Now

मराठा आरक्षण बाबतीत आता सरकार चा निर्णय चालू आहे . या तच नुकते ज्यांच्याकडे कुणबी नोदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे . अशा बाबतीत मराठा समाजात प्रश्न पडला आहे की ज्यांच्याकडे कुणबी नोदि त्यांनी काय करावे ? मराठा आणि कुणबी यांच्यामधे फरक काय ? मराठा समजतील कुणबी नसलेल्या मागासवर्गीय कुटुंबाने काय करावे.

कुणबी समाज हा म्हणजे शेती करणारा समाज असे म्हणले जाते. यासाठी कुणबी या शब्दाची अनेक नावे आहेत . कुणबी म्हणजेच हुळंबी किंवा कुटूंबीकता दर्शवतो. कुणबी हा शब्द कुर आणि बी या शब्दांना जोडून तयार केलेला आहे. यात कर म्हणजे लोक बी म्हणजे बिया आसा होतो एक बिया लावून अनेक बिया काडतात यालाच कुणबी असे म्हणतात.

मराठा आणि कुणबी यांच्यामधे फरक काय ?
मराठा – कुणबी

मराठा समाज नेमका कोन ?

मराठा हे शत्रिय होते. महाराष्ट्रात सातवाहन, बकाटक, खुर, भोज, कलचुरी, राष्ट्रकूट, चालुक्य, गुर्जर, कदम, मानक, यादव हे सगळे शत्रिय राज्यवंश होऊन गेले. या रजवांशाशी माराठाचे समंध सगण्यात येतात. सातवाहन राजे ज्यांनी महाराष्ट्राच्या मोठ्या भागावर राज्य केलं त्यांच्या राजवटीत महारथी असे पद होत. या महारथ शब्दावरून पुढे मराठा नाव असे पाडण्यात आल.

मराठा हे कुणबी होते का?

मराठ्यांना राज्यसत्ता मिळली असली तरी सुधा त्यांचा मूळ व्यवसाय हा शेतीच होता. युद्धाच्या काळी युद्धात लढन, मोहिमेवर जाणे ही कामे मराठे करत होते. यानंतर पुन्हा ते आपली शेतीसुधा करत होते यांनंतर छत्रपती शिवाजी महारजांच्या काळात शेतीतील मोठा समाज लढण्यासाठी युद्ध मध्ये जात असे त्यामुळे त्यांचं नाव हे मराठा पडलं तरी सुधा ते युद्धानंतर शेती करत आसे त्यामुळे मराठा हाच कुणबी आणि कुणबी हाच मराठा आहे.

एका अभगात संत तुकारा महाराज म्हणतात –

बरे देवा कुणबी केलो । नाही तरि दंभेंचि असतो मेलो ॥१॥
भले केले देवराया । नाचे तुका लागे पाया ॥

संत तुकाराम महाराज

तरी सुधा संत तुकारामाचे वारस सुधा मराठे म्हणून ओळखले जातात. महात्मा जोतिबा फुले यांनी सुधा मराठा आणि कुणबी एकच असल्याचे म्हणल होत.

पंजाबराव दशमुख यांनी शेतकऱ्यांसाठी आरक्षण सुरू केले याकाळात काही मराठ्यांनी आम्ही शत्रिय मराठे आहोत आम्ही स्वतःला मागासवर्गीय कुणबी म्हणून घेणार नाही असे बोलण्यात आले होते पण  विदर्भातील मराठ्यांनी ही चूक न करता कुणबी नोद करून घेतली आणि त्या समाजाला आरक्षण मिळू लागलं.

मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे का ?

मराठा आरक्षण देताना काही सामाजिक राजकीय लोक म्हणत आहे की आरक्षण जाती प्रमाणे न देता आर्थिक निकषावर द्यावे. अशा वेळी माराठा समजतील काही मोजके लोक सोडले तर सगळ्यांचा व्यवसाय शेती आहे . त्यामुळे बहुसंख्य मराठा हा कुणबी आहे . महाराष्ट्रामध्ये सापडलेल्या अनेक पुरव्या मध्ये मराठा हाच कुणबी आणि कुणबी हाच माराठी असल्याच्या नोंदी सापडल्या आहेत. या मधूनच ज्यांच्याकडे कुणबी नोंदी सापडल्या नाहीत त्यांना आरक्षण न भेटणे हा त्यंच्यावरती अन्याय आहे .

निजामकाळी अनेक कुणबी असलेले कागतपत्रे जाळण्यात आली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणत नोंदी मराठवाडा आणि पश्चिम भागात आढळत नाहीत . त्यामुळे मोठ्या प्रमानात या समजतील लोकांना कुणबी नोंदी सापडल्या नाहीत . निजामशाही संपल्या नंतर सगळ्यांची जात ही मराठा झाली. त्यामुळे आज जेही मराठे आहेत तेच कुणबी आहेत.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी काही काळासाठी आरक्षण दिले होते तरी पण आज बहुसंख्य समाज हा आरक्षण घेत आहे यातच हा प्रश्न पडतो की मराठा समाजाची आर्थकदृष्टया मागासलेला असून सुधा त्यांना आरक्षण का मिळत नाही. १९९५ ला मराठा आरक्षण भेटले असते तर आज मराठा समाजाची 2 लाख घरे हे सरकारी नोकरी मध्ये कार्यरत असती. यातच मराठा समाजाने हा अन्याय सहन न करता आरक्षण साठी लढल पाहिजे आणि आरक्षण घेतलंच पाहिजे . मराठा समजाचा सुधा आरक्षण वरती हक्क आहे कारण त्यांची आता आर्थिक पात्रता खाली गेली आहे मोठा मराठा समाज हा शेती वर आधारित आहे . शेती मध्ये नसणारे भाव , पैस्या साठी सोडलेले शिक्षण या मुळे हा समाज आता उंबरठ्यावर येऊन उभा राहिला आहे . सरकार ने याचा गांभीर्याने विचार करून मराठा समजला आरक्षण द्यावे.

सरकारने याचा ही गांभीर्याने विचार करावा की जो प्रगत झालेला sc st obc समाज आहे तो आज ही आरक्षण बंद करावे कारण त्यांच्यामुळे गरीब sc st obc चे नुकसान होत आहे मोठ्या प्रमाणात मोट मोठे पदांवर्ती बसून सुधा यांना आरक्षण आणि सुख सोयी घेता येत आहेत हा बाकीच्या समजा वरती अन्याय आहे .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment